मुंबई – प्रसिद्ध न्यूरोसर्जन, विचारवंत आणि लेखक डॉ. पी. एस. रामाणी यांच्या “अध्यात्मज्ञान” या ८०व्या पुस्तकाचे मराठी व इंग्रजी भाषांतील प्रकाशन सोहळा मुंबईतील ऑर्किड हॉटेल येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
डॉ. रामाणी यांनी यापूर्वी वैद्यकीय व सामाजिक विषयांवर अनेक पुस्तकं लिहिली असून, या नव्या पुस्तकात त्यांनी अध्यात्म, मन:शांती आणि जीवनाच्या गूढ प्रवासाविषयी सखोल विचार मांडले आहेत.
कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. पुस्तकाचे प्रकाशन, काही भागांचे वाचन आणि ‘विज्ञान आणि अध्यात्म’ यावर चर्चा यामुळे संपूर्ण कार्यक्रम अतिशय प्रेरणादायक ठरला.
या पुस्तकातून आजच्या धकाधकीच्या जीवनातही अंतर्मुख होण्याचा आणि मन:शांती मिळवण्याचा मार्ग सापडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.